SBI PO पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

SBI PO 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाची (state bank of India) पूर्व परीक्षा नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे.ल२०५६ रिक्त पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी एसबीआयतर्फे मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर मार्गदर्शक तत्वे पाहता येणार आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरीतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एसबीआय पीओ २०२१ परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे १० लाख उमेदवार अर्ज करतात. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर येताना प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि चार पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवावे लागतील. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेची वेळ ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठविली जाणार आहे. परीक्षेवेळी उमेदवारांनी पूर्ण हाताचे शर्ट, पूर्ण शूज आणि कोणत्याही प्रकारचे फॅन्सी दागिने घालू नयेत. उमेदवारांना मास्क घालणे गरजेचे आहे. स्वतःची सॅनिटायझरची बॉटल आणावी लागेल आणि सोशल डिस्टन्सिंग बाळगावे लागेल. परीक्षेसाठी उमेदवारांना एक तासाचा वेळ दिला जाईल. ज्यामध्ये प्रत्येकी २० मिनिटांचे ३ विभाग असतील. एकूण १०० प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येकाला एक गुण असेल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल. तर एकूण गुणांपैकी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ निगेटीव्ह गुण दिले जातील. परीक्षेला बसण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवावीत. करोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. उमेदवारांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून डाउनलोड करता येणार आहे. एसबीआय पीओ पीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी क्रेडेन्शियल्स म्हणजे नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागणार आहे. या स्टेप्स फॉलो करा सर्वप्रथम भारतीय स्टेट बॅंकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in.वर जा होमपेजवर असलेल्या 'Pre Examination Training Materials' सेक्शनवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी नोंदणी, जन्मतारीख भरा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर ते काळजीपूर्वक तपासावे. त्यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास SBI शी संपर्क साधून ती दुरुस्त करून घेऊ शकता. एससी/एसटी/ धार्मिक अल्पसंख्याक (SC/ST/Religious Minority Communities)उमेदवारांसाठी प्री ट्रेनिंग (Pre Examination Training)भारत सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DCaw8k
via IFTTT

Post a Comment

0 Comments