FYJC Online 2nd Round: दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७६,२३१ विद्यार्थ्यांना प्रवेश

2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज सकाळी ११ वाजता जाहीर झाली. या यादीत मुंबई विभागातील महाविद्यालयांमध्ये सर्व शाखांच्या मिळून एकूण १,४७,०३३ जागा (आरक्षण वगळून) दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. एकूण १,५८, ८१० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी ७६,२३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. एकूण २०,३७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. पहिल्या फेरीत एकूण ७८,६१० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले होते. त्यानंतर ही प्रवेश परीक्षा मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेमुळे थांबली होती. हे आरक्षण वगळून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर ही प्रक्रिया जिथे थांबली होती तेथून पुन्हा सुरु झाली. त्यानंतर शनिवारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. दुसऱ्या फेरीसाठी एकूण २,४२,२२० जागा रिक्त होत्या. कनिष्ठ महाविद्यालये ९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार दिलेल्या प्रवेशाची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. तिसऱ्या फेरीसाठी किती जागा आहेत, त्याचा तपशील १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल. दुसऱ्या यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश कला - ७,४३३ वाणिज्य - ४६,६०० विज्ञान - २१,५८८ एमसीव्हीसी - ६१० एकूण - ७६,२३१ अकरावी ऑनलाइनच्या दुसऱ्या फेरीची सर्व माहिती पुढीलप्रमाणे - डाऊनलोड कशी करावी? - अकरावी ऑनलाइनच्या या संकेतस्थळावर जा. - मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद किंवा अमरावती यापैकी तुमचा विभाग निवडा. - तुमचा आयडी आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करा. - सबमीट करा आणि अलॉटमेंट निकाल पाहा. हेही वाचा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36I4Vza
via IFTTT

Post a Comment

0 Comments