IAF AFCAT: ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ

2021: भारतीय वायूदलाने एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test, AFCAT) साठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता उमेदवार या परीक्षेसाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर afcat.cdac.in वर भेट द्यावी लागेल. या मुदतवाढीनंतर आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे भारतीय वायूदलाने कळवले आहे. नोटिफिकेशननुसार IAF ने महिला उमेदवारांसाठी अतिरिक्त भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती अॅडमिन, लॉजिस्टिक आणि अकाउंत आदीसह अन्य विभागात होणार आहे. इच्छुक उमेदवार ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त पदांची संख्या २४४ आहे. फ्लाइंग ब्रान्चमध्ये एसएससी आणि परमनंट कमिशन आणि ग्राऊंड ड्युटी मध्ये पीसी आणि एसएससीसाठी जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांनी २५० रुपये शुल्क द्यावे लागेल. IAF AFCAT 2021: पदांचा तपशील ग्राउंड ड्युटी टेक्निकल- ९६ ग्राउंड ड्युटी नॉनटेक्निकल- ७६ निवड प्रक्रिया परीक्षा, ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट, पिक्चर परसेप्शन, डिस्कशन टेस्ट, सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते. अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34HMklt
via IFTTT

Post a Comment

0 Comments