Also visit www.atgnews.com
ICSE बोर्डाने राज्यांना केलं आवाहन - 'या' तारखेपासून उघडा शाळा
Exams: काऊन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा (Schools reopen) उघडण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आयसीएसई बोर्डाने आगामी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचा (ISC and ICSE Exams) हवाला दिला आहे. आयसीएसई बोर्डाने असे सांगितले आहे की आतापर्यंत वर्ग ऑनलाइन किंवा संमिश्र पद्धतीने घेण्यात येत आहेत. परिणामी प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट सारखा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. म्हणूनच मंडळाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की ४ जानेवारी २०२१ पासून किमान अंशत: का होईना, परंतु 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा खुल्या करण्यास परवानगी द्या. जेणेकरुन या वेळेत विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल वर्क, प्रोजेक्ट वर्क, एसयूपीडब्ल्यू वर्क आणि शंका निरसनासाठी वापरू शकतील. त्यांना शाळेत जाणे आवश्यक आहे. बोर्डाने सांगितलं की परीक्षेआधी काही दिवस विद्यार्थ्यांनी थेट शाळेत जाऊन आपल्या शिक्षकांना अभ्यासातील शंका विचारू शकतात. हे त्यांच्यासाठी खूपच उपयोगाचं ठरेल. मात्र बोर्डाने अद्याप २०२१ च्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकाला अद्याप अंतिम स्वरुप दिलेले नाही. बोर्डाने असे सांगितले की मंडळाने भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांची यादी मागितली आहे. जेणेकरून त्यानुसार बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक तयार करता येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KYUcId
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments