NEET Counselling 2020: दुसऱ्या फेरीची यादी जाहीर

Maharashtra NEET Counselling 2020: राज्यातील नीट काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीची अलॉटमेंट यादी (NEET Counselling 2020) सीईटी कक्षाने (CET Cell) जाहीर केली आहे. सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट mahacet.org वरून ही यादी डाऊनलोड करता येईल. स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने राज्याच्या कोट्यांतर्गत एमबीबीएस आणि बीडीएसमध्ये अॅडमिशनच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादीदेखील जाहीर केली आहे. यापूर्वी कक्षाने आयुर्वेदिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी निवड यादी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत नाव आलेल्या उमेदवारांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gLwQl3
via IFTTT

Post a Comment

0 Comments