Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाकडून UGC च्या नियमांना बगल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ अनुदान आयोगाने () दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांनी कॉलेजांना शैक्षणिक दिनदर्शिका () देणे आवश्यक आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र असे कोणतेही वेळापत्रक न देता विद्यापीठाने थेट प्रथमवर्ष परीक्षांचे आयोजन करण्याचे परिपत्रक काढले आहे. हा प्रकार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशींचे उल्लंघन आहे, असा आरोप () या प्राध्यापक संघटनेने केला आहे. तसेच या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही संघटनेने केली आहे. करोना महामारीमुळे सर्व परीक्षा आणि वर्ग ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश झाले असून कॉलेजांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र हे वर्ग कसे सुरू करायचे आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रवेश योग्यरित्या झाले की नाही, यासंदर्भातील कोणतीही विचारपूस मुंबई विद्यापीठाने कॉलेजांकडे केलेली नाही. यूजीसीकडून नव्या शैक्षणिक दिनदर्शिकेची घोषणा करण्यात आली. मात्र मुंबई विद्यापीठाने आपल्या नव्या शैक्षणिक वर्षाची दिनदर्शिका कॉलेजांना कळवली नाही. मात्र प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश मात्र दिले आहेत. कॉलेजांनी ९० दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण करायचा असून त्यानंतर परीक्षाचे आयोजन करण्याचा यूजीसीचा नियम आहे. मात्र त्या नियमाचे उल्लंघन करून ९० दिवसांच्या आधीच परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाने कॉलेजांना दिले आहेत. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या प्रश्नी लक्ष देण्याची मागणीही केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33Uh823
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments