Also visit www.atgnews.com
एसबीआयमध्ये भरती; ४२ हजारांपर्यंत पगार
SBI jobs: जर तुमच्याकडे इंजिनीअरिंगची डिग्री (BE/BTech) असेल तर तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँकेने अभियंत्यांच्या रिक्त जागांवर भरती सुरू केली आहे. या भरतीचे सर्व तपशील, महत्त्वाच्या तारखा आणि अन्य माहिती पुढे देत आहोत. या पदांवर नियुक्तीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. आदा अर्जांची छाननी होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमदेवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. पे स्केल या पदांवर नियुक्ती केली जाणाऱ्या उमेदवारांना २३,७०० रुपये प्रति महिना ते ४२,०२० रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. पदांची माहिती ही भरती फायर इंजिनीअर (Fire Engineer) पदांवर होत आहे. एकूण रिक्त जागांची संख्या १६ आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून बीई (फायर) किंवा यूजीसी / एआयसीटीई मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. कमाल ४० वर्षे वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जांचा तपशील एसबीआयच्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली होती. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जानेवारी होती, पण ती वाढवून २७ जानेवारी २०२१ करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर पुढे दिलेल्या अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करू शकता. शुल्क सर्वसाधारण, ईडब्ल्यूसी आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ७५० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bIeKjq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments