Also visit www.atgnews.com
JEE Main च्या 'या' बोगस वेबसाइटवरून भरू नका अर्ज; NTA ने केले सावध
Update: इंजिनीअरिंग यूजी प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२१ च्या नावे एक बनावट वेबसाइट सुरू आहे. या वेबसाइट वर जेईई मेन २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत आणि शुल्कही भरले जात आहे. या सर्व प्रकाराबद्दल माहिती देत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. एनटीएने जेईई मेनच्या या बनावट वेबसाइटबद्दल लोकांना सावध करण्यासाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात असं म्हटलंय की एनटीएकडे जेईई मेनच्या अन्य एक वेबसाइटबद्दल खूप तक्रारी आल्या. यानंतर चौकशी केली गेली. ही वेबसाइट बनावट असून jee guide नावाने सुरु आहे. चौकशीत एनटीएला असं कळलं की या वेबसाइट द्वारे जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क भरून घेतले जात आहे. शिवाय हा गैरप्रकार करणाऱ्यांनी एक ई-मेल आयडी आणि हेल्पडेस्क नंबरही जारी केला आहे. एनटीएने या वेबसाइटचे डिटेल्स जारी केले आहेत. येथे यासंबंधीची माहिती दिली जात आहे - या बोगस वेबसाइटचा अॅड्रेस आहे - jeeguide.co.in ईमेल आयडी आहे - info@jeeguide.co.in मोबाइल क्रमांक आहे - ९३११२४५३०७ विद्यार्थ्यांनी, चुकूनही या वेबसाइटवर विश्वास ठेवू नये. या साईटच्या बनावट मेल आयटी किंवा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करू नये. जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे. परीक्षेसंबंधीची कोणतीही माहिती किंवा अर्जासंबंधीची कोणतीही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्या. जर तु्म्हाला कोणत्याही तोतयेगिरीची किंवा गैरप्रकारासंबंधी माहिती मिळाली तर तुम्ही एनटीएला grivance@nta.ac.in वर इमेल पाठवून सूचना देऊ शकता. संबंधी नोटीस पाठवण्यासाठी येथे क्लिक करा. JEE Main official website वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oO9PRI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments