Also visit www.atgnews.com
रिझर्व्ह बँकेत पदवीधरांसाठी शेकडो नोकऱ्या; आजच करा अर्ज
RBI Grade B Recruitment 2021: बँकिंग क्षेत्रात (Bank Jobs) जे तरुण-तरुणी करिअर करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. अशा तरुण-तरुणींसाठी बँकेत नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत () तुम्हाला नोकरी मिळू शकते. आरबीआय (RBI) ने ग्रेड-बी ऑफिसर या पदाच्या शेकडो रिक्त जागांवर (Sarkari Vacancy) भरती सुरू केली आहे. पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक असे दोन्ही प्रकारचे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील. आरबीआय ग्रेड बी व्हेकन्सीचा तपशील, नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जांची लिंक आदी सर्व माहिती या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. पदांचा तपशील ऑफिसर ग्रेड बी (जनरल) - २७० पदे ऑफिसर ग्रेड बी (डीईपीआर) - २९ पदे ऑफिसर ग्रेड बी (डीएसआयएम) - २३ पदे पदांची एकूण संख्या - ३२२ वेतनश्रेणी आरबीआय ऑफिसर ग्रेड बी (जनरल) साठी कोणत्याही विषयात किमान ६० टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. एससी, एसटी दिव्यांगांसाठी ही अट शिथील करत ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण अशी करण्यात आली आहे. किंवा कोणत्याही विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन केले असणे आवश्यक आहे. ऑफिसर ग्रेड बी (डीआयपीआर आणि डीएसआयएम) साठी - संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री किंवा पीजीडीएम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) केलेला असावा. अधिक माहितीसाठी या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आलेल्या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा. वयोमर्यादा किमान वय २१ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. एमफिल आणि पीएचडी करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान ३२ वर्षे तर कमाल ३४ वर्षे आहे. आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. अर्ज कसा कराल? रिझर्व्ह बँकेच्या या भरतीसाठी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२१ आहे. अर्ज करण्याची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया या पदांवरील भरतीसाठी तीन टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे हे तीन टप्पे आहेत. कोणत्या पदासाठी कधी होणार परीक्षा, जाणून घ्या... ऑफिसर ग्रेड बी (जनरल) फेज १ परीक्षा ६ मार्च २०२१ रोजी होईल. फेज २ परीक्षा १ एप्रिल २०२१ रोजी होईल. ऑफिसर ग्रेड बी (डीईपीआर आणि डीएसआयएम) फेज १ परीक्षा ६ मार्च २०२१ रोजी आयोजित केली जाईल. फेज २ परीक्षा ३१ मार्च २०२१ रोजी होण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3opN2Lf
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments