करोनाची भिती कायम; पुण्यात ५० टक्के शाळा उघडूनही उपस्थिती अत्यल्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘लॉकडाउन’नंतर 'अनलॉक' झाले तरीही पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, सुमारे अकरा महिन्यानंतर अखेर पुणे जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारी सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्याच्या भागातील सुमारे ५० टक्के शाळा भरल्या असून शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरु झाला. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. मुलांना शाळेत सोडण्यास आलेले पालक शाळांमधील सुविधा पाहणी करण्यास विसरले नाहीत. पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ३ हजार ७५४ शाळा असून, त्यात ७ लाख १५ हजार ८३१ विद्यार्थी संख्या आहे. त्यामध्ये पुणे ग्रामीण भागातील तेरा तालुक्यांमध्ये १ हजार ७९४ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या ७९६ शाळामधून ५५ हजार ९ विद्यार्थी आहेत. तसेच खासगी ९९८ शाळामध्ये २ लाख ९२ हजार ९९२ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दौंड तालुका वगळता बारा तालुक्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार एकूण १ हजार ६७० शाळांपैकी १ हजार १०५ शाळा बुधवारी सुरु झाल्या. त्यामध्ये एकूण २ लाख २९ हजार २६५ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ५६ हजार ४५० विद्यार्थ्यांनी लॉकड़ाउननंतर प्रथमच शाळेत हजेरी लावली. ५० टक्के शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यींची उपस्थिती मात्र २५ टक्केच असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pDDSfH
via IFTTT

Post a Comment

0 Comments