नवीन वर्षांत केंद्र सरकारी नोकरीची संधी; हजारो रिक्त पदे

SSC CGL Notification 2020: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीची एक मोठी संधी पदवीधर तरुणांना चालून आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालय विभाग आणि अन्य संस्थांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या एकूण ६,५०६ पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेच्या (CGL 2020) माध्यमातून ही परीक्षा राबवण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करायचे आहेत. या भरती परीक्षेची अधिसूचना २९ डिसेंबर रोजी जारी झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ डिसेंबर पासून सुरू झाली आहे. पदांची माहिती ग्रुप बी मध्ये गॅझेटेड श्रेणीची २५० पदे आहे तर नॉन गॅझेटेड श्रेणीची ३,५१३ पदे आहेत. ग्रुप सी मध्ये २,७४३ पदे आहेत. एकूण ६,५०६ पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता कर्मचारी निवड आयोगाच्या कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा २०२० साठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या किंवा अन्य संस्थेच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समकक्ष उत्तीर्ण असावेत. अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरला असणारे उमेदवारही अर्ज करू शकतात. मात्र त्यांनी जानेवारी २०२० पर्यंत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा १ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय किमान १८ आणि कमाल २७ वर्षे असावे. काही पदांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38Ym0oF
via IFTTT

Post a Comment

0 Comments