B.Tech, B. Pharma अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) ने ची , B. Pharma/ Pharma D अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट शनिवारी जाहीर केली. महाराष्ट्र आणि ऑल इंडिया उमेदवारांसाठी ही मेरिट लिस्ट सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. mahacet.org या सीईटी सेलच्या वेबसाइटवर ही यादी उमेदवार पाहू शकतील. स्टेप बाय स्टेप कशी पाहायची ही मेरिट लिस्ट पाहा - - सीईटी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर mahacet.org वर जा. - होम पेजवर B.E/B.Tech लिंकवर जा. - प्रोविजनल मेरिट लिस्ट आता स्क्रीनवर दिसू लागेल. - विद्यार्थी आता MHT CET पर्सेंटाइलनुसार तयार केलेल्या या यादीत स्वत:चे नाव पाहू शकतील. बीई / बीटेकची अंतिम गुणवत्ता यादी ६ जानेवरा २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. MBA अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी ७ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार आहे. अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ४ जानेवारी रोजी जाहीर होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/384T3Ic
via IFTTT

Post a Comment

0 Comments