शाळांनी विद्यार्थ्यांना फीअभावी शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये: शिक्षणमंत्री

पुणे: शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्या पुणे येथे बालभारतीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होत्या. अनेक शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणून देत आहेत, त्यांना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड बोलत होत्या. राज्यात बुधवार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानंतर आणि पालकांच्या पूर्वपरवानगीने विद्यार्थी शाळेत येणार आहेत. याबाबत गायकवाड म्हणाल्या, 'राज्यात सुरू झालेल्या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.' राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मात्र स्कूल बसना अद्याप परवानगी मिळालेली नाही. स्कूल बस सुरू व्हावी अशी पालकांची मागणी आहे. याबाबत परिवहन विभागाशी चर्चा करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी या कार्यक्रमात दिली. दरम्यान, बालभारतीच्या नव्या वेबसाइटचे वर्षा गायकवाड यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले. तसेच किशोर मासिकाच्या मोबाइल ॲपचेही उद्घाटन गायकवाड यांनी केले. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या आज बुधवार २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YvMnxr
via IFTTT

Post a Comment

0 Comments