राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू

School reopening updates: करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या आज बुधवार २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. शहरी भागात अद्यापही शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अनलॉक प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात२३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन भरवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. आता दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता ते शाळेत येताना आरोग्यविषयक विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक शहरात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. महापालिकेच्या शाळेत सुरक्षित अंतराचे पालन करत अध्यापनाला सुरुवात झाली. खासगी शाळा दुपारी साडेअकरा वाजता सुरू झाले. पालकांचे संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात होता. नाशिकमध्ये एकूण २८२५ शाळा आहेत. औरंगाबादमध्येही झाल्या. विद्यार्थ्यांची उपस्थिती पहिल्या दिवशी चांगली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर तापमान तपासणी, सॅनिटाईज, सुरक्षित वावर आदी नियमावलीचे पालन करत विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cgwPFQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments