Also visit www.atgnews.com
आयटीआय परीक्षेत पुन्हा गोंधळाचाच पेपर!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्र सरकारच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगच्या (डीजीटी) वतीने घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन परीक्षेचा दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. सकाळी १० वाजता परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लॉग-इन केले. मात्र समोरील स्क्रिनवर प्रश्न दिसत नव्हते. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिका सबमीट केल्यावर त्यांना पुन्हा लॉगीन करण्याची सूचना मिळत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट आयटीआय संघटनेने केली आहे. आयटीआय अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रिशियन कोर्स आणि कम्प्युटर ऑपरेटिंग अॅण्ड प्रोग्रॅंमिंग या दोन विषयांची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. २८ व २९ जानेवारी असे दोन दिवस ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. असाच गोंधळ दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. कोणत्याही पूर्व आयोजनाशिवाय ही परीक्षा देशभरात घेण्यात आली. पण पुरेसे कम्प्युटर नसल्याने तसेच कनेक्टिव्हिटीच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना विनाअडथळा परीक्षाच देता आली नाही. सलग दुसऱ्या दिवशीही परीक्षेत गोंधळ झाल्याने डीजीटीने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी असोसिएशन ऑफ नॉन गर्व्हमेंट आयटीआय या संघटनेने केली आहे. काही विद्यार्थ्यांनी अपूर्ण पेपर सोडविला असतानाही त्यांची उत्तरपत्रिका सबमीट झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना कमी गुण मिळण्याची भीती वाटत आहे. करोनाच्या प्रादुर्भावात राज्यात पदवीच्या परीक्षा ही न घेता विद्यार्थ्यांना सरासरीप्रमाणे गुण देण्यात आले. त्यामुळे आयटीआयची परीक्षांची घाई कशासाठी, असा प्रश्न असोसिएशनचे सचिव देवेंद्र पाटणे यांनी उपस्थित केला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r3ds7d
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments