Also visit www.atgnews.com
पालिका शाळांमधील 'आठवी'च्या वर्गांना करोनाचा फटका
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : सन २०१९मध्ये महापालिकेच्या १२ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र करोनामुळे २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात फक्त चार शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यात यश आले आहे. यात एक मराठी आणि तीन उर्दू शाळांचा समावेश आहे. शिक्षण समितीच्या मंजुरीनंतर पालिकेने हे नवीन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी माध्यमाच्या एका वर्गात २८ विद्यार्थ्यांनी तर तीन उर्दू शाळांमध्ये ७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये धारावी काळा किल्ला शाळा तर वाडीबंदर, बापूराव जगताप मार्ग व माहीम येथील मोरी रोड शाळा क्रमांक-१ या तीन उर्दू शाळांचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, गुजराती व कन्नड या माध्यमांच्या शाळांमध्ये नव्याने आठवीचा एकही वर्ग सुरू करता आलेला नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९अन्वये सहा ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाची आहे. १३ फेब्रुवारी, २०१३ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या १०० प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग उघडण्यात आले आहेत. सन २०१५-१६मध्ये ११६ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे १५२ नवीन वर्ग उघडण्यात आले. सन २०१६-१७मध्ये ३७ शाळांमध्ये पाचवीचे व १५३ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग उघडण्यात आले. सन २०१७-१८मध्ये सहा शाळांमध्ये पाचवीचे व २४ शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग उघडण्यात मंजुरी प्राप्त झाली आहे. सन २०१८-१९मध्ये सात प्राथमिक शाळांमध्ये पाचवीचे व १०३ शाळांमध्ये आठवीचे नवीन उघडण्यास मंजुरी मिळाली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sSSEAU
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments