Also visit www.atgnews.com
भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्रीची संधी
Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नॅशनल कॅडेट कोअर (NCC) स्पेशल एन्ट्रीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाने एनसीसी स्पेशल एन्ट्रीच्या एप्रिल २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या ४९ व्या कोर्ससाठी जाहिरात दिली आहे. सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाचं भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०२१ आहे. पात्रता काय? ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के गुणांसह पदवी घेतली आहे, ते उमेदवार सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी अर्ज करू शकतात. एनसीसीचे सी सर्टिफिकेट किमान बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांहून अधिक नसावे. अर्ज कसा करायचा? सैन्यात एनसीसी स्पेशल एन्ट्री २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे. यानंतर विचारलेली माहिती भरून सबमीट करावे. नोंदणी झाल्यानंतर आपले यूजर नेम, पासवर्डद्वारे आपले अॅप्लिकेशन सबमीट करावे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b8AwN3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments