Also visit www.atgnews.com
१०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी
Republic Day 2021: देशभरातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण मंत्रालयाने रविवार २४ जानेवारी रोजी ही माहिती दिली आहे. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटनुसार 'देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या बॉक्समधून थेट प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना भेटण्याचीही संधी मिळणार आहे.' हे विद्यार्थी शालेय तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील आहेत. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावीच्या टॉपर्ससह विविध विद्यापीठे आणि यूजी, पीजी कोर्सेसच्या टॉपर्सचा या १०० विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परेड पाहिल्यानंतर प्रोत्साहन प्रमाणपत्रेही देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या १०० विद्यार्थ्यांपैकी ५० जण उर्वरित उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत. मागील वर्षीदेखील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सीबीएसई बोर्डाच्या टापर्स आणि विद्यापीठांच्या टॉपर्स अशा एकूण १०५ विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी देण्यात आली होती. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना महामारीमुळे आवश्यक त्या खबरदारीसह मोटारसायकल स्टंट आदि प्रजासत्ताक दिनाच्या संचलानाचे आकर्षण असणारे कार्यक्रम यंदा समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. शिवाय प्रेक्षकांची संख्याही घटवून २५ हजार पर्यंत करण्यात आली आहे. शौर्य पुरस्कार मिळवणारी मुले आणि अन्य पुरस्कार प्राप्त मंडळींनाही यंदाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c9f8aU
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments