Also visit www.atgnews.com
CBSE Exam 2021: सीबीएसई यंदा वाढवणार मूल्यांकन केंद्रे
अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनी दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे, मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात () बोर्डाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. परीक्षा ४ मे ते १० जून २०२१ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत, इतकेच अद्याप स्पष्ट आहे. यासंदर्भात सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी एज्युकेशन टाइम्सशी संवाद साधला. ते म्हणाले, 'करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या आयोजनासाठी अनेक प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणार आहे. यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मूल्यांकन प्रक्रियेसाठी मूल्यांकन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. मात्र शिक्षक आणि पेपर तपासनीसांना लस देण्याची जबाबदारी बोर्डाची नाही.' बोर्डाने संलग्न शाळांना प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रि-एक्झाम ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मोकळीक दिली आहे. करोना महामारीमुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या योजनांवरही परिणाम झाला. पुढील विलंब, अडचणी टाळण्यासाठी बोर्डाने निकालाची प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा झाल्यानंतर लगेच पुढील महिन्यात जुलैच्या मध्यावर निकाल जाहीर केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c9AWmL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments