द्वितीय वर्ष इंजिनीअरींग प्रवेशासाठी चुरस

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई डिप्लोमानंतर थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरींग अभ्यासक्रमाला () प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदा प्रवेशासाठी चुरस पहायला मिळत आहे. सुमारे ५ हजार ७०० हून अधिक विद्यार्थी हे विविध अभ्यासक्रमात ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे आहेत. त्यातच मागील वर्षापासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी राखीव असलेला जागांचा कोटा २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणल्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरासरी तीन ते सहा जागाच उपलब्ध आहेत. मागील वर्षी, डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक हजार २०० इतकी होती. पण यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पार पडलेल्या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांना ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुणांची लॉटरीच लागली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता, यंदा हा कोटा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. द्वितीय वर्षात रिक्त जागांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे द्वितीय वर्ष प्रवेशासाठी राखीव जागांचे प्रमाण २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आले होते. या १० टक्के जागांव्यतिरिक्त प्रथम वर्षात उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी यांच्या जागाही या विद्यार्थ्यांसाठी खुल्या केल्या जात असे. मात्र यंदा सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिल्यामुळे त्या जागाही रिक्त मिळाल्या नाहीत. यामुळे १० टक्के जागांमध्येच प्रवेश द्यावे लागणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ohp7ON
via IFTTT

Post a Comment

0 Comments