Also visit www.atgnews.com
राजकारणात येऊ नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना सल्ला!
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'कोणतेही क्षेत्र निवडताना त्यातून मिळणारा आनंद आणि पैसा याचा विचार करा. मी राजकारणात पडलो आणि अडकलो. आता बाहेरही पडता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांनो राजकारणाच्या भानगडीत पडू नका,' असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिला. राजकारणापेक्षा प्रशासकीय सेवा किंवा स्वत:च्या व्यवसायाबाबत विचार करा, असेही सांगण्यास पवार विसरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण विभागाचे सभापती रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबूराव वायकर, सारिका पानसरे, पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, 'जनतेची मर्जी असेपर्यंत आम्हाला खुर्ची मिळते. मात्र, प्रशासकीय सेवेतील अधिकारी निवृत्त होईपर्यंत खुर्चीवर असतो. योजनेची प्रभावी अंमलबाजवणी त्याच्या हाती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरचा निर्णय घेताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा आणि अधिकारी व्हा. ज्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घ्याल, तेथे आई-वडिलांचे नाव मोठे करा. विश्वासार्हता संपली की माणूस संपतो.' मित्र निवडताना चांगले मित्र निवडा असेही सांगण्यास मंत्रिमहोदय विसरले नाहीत. शिवतरे यांनी प्रास्तविक केले. शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी आभार मानले. हेही वाचा: तुम्हीही, व्यायाम करा...! सकाळी लवकर उठून आवश्यक व्यायाम करा, असा सल्लाही पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यायामाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिल्यानंतर ते व्यासपीठावरील मंडळींनाही सांगा, असे विद्यार्थीच सांगतील. त्यापेक्षा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही व्यायाम केला पाहिजे, असेही सांगण्यास पवार विसरले नाहीत. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YtMGbW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments