पहिल्यांदाच होणार 'अशी' परीक्षा.. 'गो विज्ञान' वर राष्ट्रीय परीक्षा

Gau Vigyan Pariksha: गायींबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देऊन तुम्ही गायींच्या विज्ञानाविषयीचे () तज्ज्ञ होऊ शकता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? राष्ट्रीय कामधेनू आयोगाने या परीक्षेची घोषणा केली आहे. २५ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. कामधेून आयोग (RKA) मंगळवारी ५ जानेवारी २०२१ रोजी या परीक्षेची घोषणा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांनी सांगितले की, 'देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची परीक्षा होत आहे. आता दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येईल.' कोण देऊ शकतं परीक्षा? आयोगाने सांगितले की या गो विज्ञान परीक्षेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी तसेच कोणीही सामान्य व्यक्ती या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 'कामधेनू गो विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा' (Kamdhenu Gau Vigyan Prachar Prasar Exam) असं या परीक्षेचं नाव आहे. परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? कशी कराल तयारी? परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, गोमांसावरील अभ्यासाचे साहित्यही परीक्षेच्या तयारीसाठी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. का होत आहे परीक्षा? वल्लभभाई कथिरीया म्हणाले की, 'तरुण विद्यार्थ्यांमध्ये आणि इतर नागरिकांमध्ये गायीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा सुरू केली जात आहे. या चाचणीमुळे गायींबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढेल. बहुतेक लोकांना माहित नसलेल्या गायींच्या क्षमतेबद्दल त्यांना माहिती देण्यात येईल. गाईने दूध देणे बंद केले तरीसुद्धा, अन्य अनेक प्रकारे ती व्यवसायातील किती संधी देऊ शकते हे लोकांना कळू शकेल.' या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या गुणवंत उमेदवारांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये (RKA) ची स्थापना केली होती. हा आयोग मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. गायी आणि गोवंशाचा विकास, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/399ibNl
via IFTTT

Post a Comment

0 Comments