'या' शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका: मुंबई महापालिकेचे आवाहन

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : शहरातील २०६ खासगी शाळा बेकायदा () आहेत. यामुळे या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या () शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी विशेष परवानग्या घेणे आवश्यक आहे. या शाळांनी त्या घेतलेल्या नाहीत. यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी योग्य ती कागदपत्रे तपासा, असे आवाहन पालिकेने केले आहे. यातील बहुतांश शाळा या पूर्व आणि उत्तर मुंबईतील आहेत. ६७ शाळा एम वॉर्ड म्हणजे मानखुर्द, गोवंडी परिसरातील आहेत. तर उर्वरित शाळा या मालाड, मालवणी, घाटकोपर आणि भांडुप परिसरातील आहेत. या शाळा बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यामुळे पालकांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही शाळा केंद्रीय मंडळ तर, काही शाळा आयजीसीएसई मंडळाच्या आहेत. सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या शाळांना १ लाख रुपये दंड ठोठावण्यात येऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्यांना मान्यतेसाठी पालिकेकडे नव्याने अर्ज करावा लागणार आहे. यापूर्वी या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. सध्या सर्वच शाळा बंद आहेत. यामुळे त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार नसली तरी जेव्हा शाळा सुरू होतील, तेव्हा मात्र या शाळा सुरू होणार नाहीत, यासाठी आम्ही खबरदारी घेणार असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. माध्यमनिहाय शाळा इंग्रजी - १६२ उर्दू - १६ हिंदी - १५ मराठी - १३ हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3s2gMB1
via IFTTT

Post a Comment

0 Comments