लोकल सुरू झाल्या आता कॉलेजेही लवकर सुरू होतील: उदय सामंत

College Reopening: मुंबईकरांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. मुंबईतील दळणवळणाचं मोठं साधन असलेली रेल्वे सेवा १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसंबंधीची देखील एक घोषण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. लोकल सुरू झाल्या आता कॉलेजे देखील लवकर सुरू होतील, असे सामंत म्हणाले. शुक्रवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइंट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, मनोहर कुंटे, आदिनाथ मंगेशकर, मयुरेश पै, प्रियंका खिमानी, निलाद्री कुमार आदि संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठांतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन होणार आहे. ही घोषणा करण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा अभ्यास करण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत मंगेशकर कुटुंबीयांसह पंडित शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेन, ए. आर. रहमान, शंकर महादेवन, निलाद्री कुमार यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. ही समिती तीन महिन्यात अहवाल देणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी हृदयनाथ मंगशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'आतापर्यंत सर्व मुख्यमंत्री यांना भेटलो पण त्यानी या कॉलेजसाठी जागा देणार यासाठी विनंती केली. केवळ आश्वासने दिली. मात्र या सरकारने हे प्रत्यक्षात आणले.' हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tfulxB
via IFTTT

Post a Comment

0 Comments