ICSE बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून

Schools: करोना महामारीमुळे बोर्डाच्या परीक्षांना यंदा विलंब झाला आहे. मात्र बोर्डाशी संलग्न शाळांचे शैक्षणिक सत्र वेळेत सुरू होणार आहे. काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने ही घोषणा केली आहे. बोर्डाशी संलग्न शाळांचे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्याच्या मध्यावर आणि जून महिन्याच्या सुरुवातीला सुरू होईल. बोर्डाने शाळांच्या प्राचार्यांना पाठवलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. टेकड्यांवरील शाळा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीत नवं शैक्षणिक वर्ष सुरू करू शकतील. शहरी भागातील काही आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य शाळा त्या-त्या वेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेणार आहेत. काऊन्सिलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या करोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम २०२० च्या संपूर्ण शैक्षणिक वर्षावर झाला आहे. म्हणूनच पुढील वर्ष नियमितपणे सुरू व्हावं असं शिक्षक, विद्यार्थी, पालकांना वाटत आहे. बोर्डाचाही तसाच प्रयत्न आहे. शाळांकडून २०२१-२२ या शैक्षणिक सत्राबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. हेही वाचा: हेही वाचा: आयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून म्हणाले, 'आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने शाळा चिंतेत आहेत. या परीक्षा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार नाहीत. या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नियमित पद्धतीने होणार आहे.' हेही वाचा: हेही वाचा: दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली. सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ckzWwr
via IFTTT

Post a Comment

0 Comments