Also visit www.atgnews.com
कोविड -१९: भारतीय विद्यार्थ्यांना चीनने नाकारली परवानगी
जागतिक पातळीवरील करोना महामारी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये परतण्याची परवानगी नाकारली आहे. चीनमधील भारतीय दूतावासाने यांसदर्भातली निवेदन जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'करोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून चीनच्या अधिकाऱ्यांनी भारत आणि यादरम्यानच्या कोणत्याही चार्टर्ड विमान उड्डाणांना परवानगी दिलेली नाही.' कोविड १९ पुन्हा डोकं वर काढत असल्याने निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. विशेषत: चीनमध्ये प्रवेशाबाबतचे निर्बंध कठोर केले आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली. भारतीय नागरिकांनी २ नोव्हेंबर २०२० पूर्वी केलेले व्हिसा अर्ज रोखून धरलेले आहेत. हाही याच निर्बंधांचा भाग असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. 'भारतीय विद्यार्थ्यांनी दूतावासाचे संकेतस्थळ, सोशल मीडिया चॅनेल्सवर लक्ष ठेवू स्वत:ला अपडेटेड ठेवावे,' असे आवाहनही भारतीय दूतावासाने केले आहे. दरम्यान, चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पुढील काही महिने हे निर्बंध शिथील होण्याची शक्यता नाही. येथील विद्यार्थ्यांना देखील पुढील सत्राचा अभ्यास ऑनलाइन माध्यमातूनच करायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38t8MkH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments