Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समांरभ
विविध विद्या शाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदव्या १४० विद्यार्थ्यांना पीएचडी एमफिल, तर १६ विद्यार्थ्यांना पदके म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठाचा वार्षिक आज, सोमवारी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. तर सन्माननीय उपस्थिती म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित असणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडणार आहे. या वर्षीच्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ९८ हजार २६१ विद्यार्थिनी तर ९३ हजार २३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ६१ हजार ९३४ तर पदव्युत्तरसाठी २९ हजार ५६१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी २०,००१, आंतरविद्याशाखेसाठी ८७६३, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १,११,२४४ आणि विज्ञान-तंत्रज्ञान शाखेसाठी ५१,४८७ पदव्यांचा समावेश आहे. विविध विद्याशाशाखेतील १४० विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १६ विद्यार्थ्यांना पदके बहाल करण्यात येणार आहेत. आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर आणि https://www.youtube.com/channel/UCNQQByo2cn85ijVt2bf07pw या यूट्यूब लिंकवर करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असल्याचे परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3td5N8c
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments