राज्यातील कॉलेजांचे वर्ग भरणार; लवकरच निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शिक्षण संस्था आणि कॉलेजांना प्रत्यक्ष वर्ग भरवण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तसेच राज्यातील कॉलेजे उघडण्यासंदर्भात चर्चा केली. उदय सामंत यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'राज्यपालांशी आज मी सविस्तर चर्चा केली. उद्या, सोमवारी सर्व कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. त्यात कॉलेजांचे वर्ग भरवण्यासंदर्भात सविस्तर करण्यात येईल. त्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल.' ‘कॉलेज उघडण्यासंदर्भात आमची तयारी आहे. मात्र राज्य सरकार निर्णयच घेत नाही. आपण कुलपती या नात्याने हस्तक्षेप करावा’, असा आग्रह सर्व कुलगुरूंनी राज्यपाल यांच्याकडे केला होता. तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय होत नव्हता. मात्र आता दोनेक आठवड्यात कॉलेजांचे वर्ग भरवले जाण्याची शक्यता आहे. राज्यात सार्वजनिक व खासगी अशी एकूण ६२ विद्यापीठे आहेत. त्याच्या अधिपत्याखाली चार लाख ५७१ कॉलेजे असून, दोन हजार २६२ स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ४२ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या १ लाख ५८ हजार इतकी आहे. कुलगुरूंचा पुढाकार राज्यातील ५ ते ८ इयत्तेचे वर्ग २७ जानेवारीपासून भरवले गेले आहेत. ९ ते १२ इयत्तेचे वर्ग त्यापूर्वी भरवले जात आहेत. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सर्वांना खुली होत आहे. एसटी, बस, खाजगी वाहतूक यांच्यावरील करोनाकाळातील टाळेबंदीचे निर्बंध हटवले गेले आहेत. तरी राज्यातील कॉलेजे, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांतील वर्ग प्रत्यक्ष भरवण्याच्या हालचाली नव्हत्या. शेवटी राज्यातील २० कुलगुरूंनी पुढाकार घेतला आणि राज्यपाल यांच्याबरोबर शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ox8rlz
via IFTTT

Post a Comment

0 Comments