पहिल्या दिवशी नऊ लाख विद्यार्थी शाळेत

पहिल्या दिवशी ९ लाख विद्यार्थी शाळेत पाचवी ते आठवीच्या ८५ टक्के शाळा सुरू म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा प्रादुर्भाव कमी होत झाल्याने २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या तब्बल २८ हजार ४७३ शाळा सुरू झाल्या. या शाळांमध्ये ९ लाख ८७ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या ३०.४४ टक्के होती. तर राज्यातील तब्बल २८ हजार ४७३ शाळा सुरू झाल्या. नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू केल्यानंतर टप्प्याटप्याने अन्य वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानुसार २७ जानेवारीला मुंबई, ठाणे व नवी मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करत योग्य ती काळजी घेत शाळा सुरू करण्यात आल्या. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक होते. तर विद्यार्थ्यांची उपस्थिती ही २० ते ४० टक्क्यांपर्यंत दिसून आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची संख्या अल्प दिसली तरी राज्यातील ३२ लाख ४५ हजार ५१२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ लाख ८७ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली होती. चंद्रपूरमध्ये १०० टक्के शाळा सुरू झाल्या. त्याखालोखाल अकोला ९९.७६ टक्के, वाशिम ९८.७६ टक्के, गडचिरोली ९८.५३ टक्के, यवतमाळ ९७.६५ टक्के, गोंदिया ९७.३५ टक्के, पुणे ६८.४२ टक्के, नागपूर ६४.३२ टक्के आणि पालघरमध्ये ६०.३१ टक्के शाळा सुरू झाल्या. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होण्याचे प्रमाण अधिक असले तरी सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती गडचिरोलीमध्ये ६५.५३ टक्के होती. त्याखालोखाल गोंदियामध्ये ५२.८५ टक्के, सातारा ४९.९०, चंद्रपूर ४७.८१ टक्के, भंडारा ४३.८४ टक्के आणि नाशिक ४३.२४ टक्के होती. ४९३ शिक्षक पॉझिटिव्ह शाळेत येण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या करोनाचाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९७ हजार २२३ शिक्षकांची करोनाचाचणी केली असता त्यातील ४९३ शिक्षकांना लागण झाल्याच आढळून आले. त्याचप्रमाणे २१ हजार २१३ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली त्यातील १६१जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iYZwsg
via IFTTT

Post a Comment

0 Comments