Also visit www.atgnews.com
सीबीएसईचे संपूर्ण वेळापत्रक कधी होणार जाहीर? जाणून घ्या
Datesheet 2021 Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE (सीबीएसई) बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी सुरू होणार हे बोर्डाने जाहीर केलं आहे. मात्र या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मात्र अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. यासंदर्भात गुरुवारी एक दिलासादायक माहिती मिळाली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली. पोखरियाल यांनी यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YjxhL8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments