Also visit www.atgnews.com
CLAT 2021: बदलली परीक्षेची तारीख, नवे वेळापत्रक जाणून घ्या...
CLAT Exam 2021: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. देशातील २२ नॅशनल लॉ विद्यापीठांमधील एलएलबी (LLB) आणि एलएलएम (LLM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी क्लॅट परीक्षा आधी ९ मे २०२१ रोजी होणार होती. सीएनएलयूने सांगितले की बूधवारी ६ जानेवारी रोजी कार्यकारी समितीची बैठक झाली. यात परीक्षेची तारीख बदलण्यावर विचार झाला. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ (CBSE Board Exam 2021) मुळे क्लॅट २०२१ परीक्षेची तारीख बदलण्यात येत आहे. क्लॅट २०२१ चे आयोजन १३ जून २०२१ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ चे शेड्युल जारी केले होते. सीबीएसई दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा ४ मे पासून सुरू होत आहे. ही परीक्षा १० जून पर्यंत चालणार आहे. अशात बोर्ड परीक्षेच्या तारखेशी क्लॅश होऊ नये म्हणून क्लॅट परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. CLAT 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरू क्लॅट २०२१ साठी १ जानेवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची प्रक्रिया क्लॅटच्या consortiumofnlus.ac.in या संकेतस्थळाद्वारे पूर्ण करायची आहे. या आहेत देशातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगलुरू (NLSIU Bengaluru) नालसर यूनिवर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद (NALSAR University of Law, Hyderabad) नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, भोपाल (NLU, Bhopal) द वेस्ट बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्यूरिडिशियल सर्विसेस, कोलकाता (NUJS Kolkata) हिदयतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपुर (NLU Raipur) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर (NLU Jodhpur) गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU Gandhinagar) डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनऊ (NLU Lucknow) राजीव गांधी नेशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पंजाब (NLU Punjab) चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा (CNLU Patna) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज, कोच्ची (NLU Kochi) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशा (NLU Odisha)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2JWrkQS
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments