GATE Exam 2021: गेट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

2021: ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१ (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेचे अॅडमिट कार्ड संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. गेट परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ वरून उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. परीक्षा ६,७,१३ आणि १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. परीक्षेचा निकाल २२ मार्च रोजी जाहीर होणार आहे. एकूण ८,८२,६८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ८.५९ लाख उमेदवरांनी नोंदणी केली होती. या वर्षी गेट परीक्षेसाठी बसणाऱ्या मुलींचं प्रमाण देखील वाढलं आहे. एकूण २,८८,३७९ विद्यार्थीनीं या परीक्षेला नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या १० हजारांनी अधिक आहे. जे ही परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात आयआयटीमधील एम.टेक्. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. एकूण ८,८२,६८४ उमेदवारांनी गेट परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यापैकी १४,१९६ विद्यार्थ्यांनी नव्या ह्युमॅनिटी विषयासाठी नोंदणी केली आहे. GATE 2021 Admit Card: पुढीलप्रमाणे डाऊनलोड करा गेट अॅडमिट कार्ड - सर्वात आधी GATE च्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर जा. - अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा. - रजिस्ट्रेशन क्रमांक / रोल नंबर आदी माहिती भरा. - आता स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल. - अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊटही घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35lLsDo
via IFTTT

Post a Comment

0 Comments