IBPS RRB सहाय्यक पद भरती: पूर्व परीक्षेचे गुण जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने ग्रामीण बँकांमध्ये सहाय्यक पदांच्या भरतीसाठी झालेल्या पूर्व परीक्षेचे गुण उमेदवारांसाठी उपलब्ध झाले आहेत. परीक्षेतील गुण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे. या परीक्षेचा निकाल २१ जानेवारी रोजी जाहीर झाला होता. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना २० फेब्रुवारी रोजी मुख्य परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहेत. अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे की ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी तात्पुरत्या स्वरुपात शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना नियमितपणे अद्ययावत माहितीसाठी आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन केले जात आहे. मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल. या परीक्षेत रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा, हिंदी भाषा आणि गणिती प्रश्न विचारले जातील. परीक्षेत एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले जातील. हेही वाचा: एसबीआय सीबीओ निकाल २०२० जाहीर भारतीय स्टेट बँकेने एसबीआय सीबीओ निकाल २०२० जाहीर केला आहे. सर्कल बेस्ड ऑफिसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येईल. sbi.co.in हे एसबीआयचे अधिकृत संकेतस्थळ आहे. ही परीक्षा २८ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरात विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. ज्या उमदेवारांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांनी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीच्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t4bViZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments