IBPS: ऑफिस असिस्टंट, ऑफिसर पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर

IBPS Result: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने गुरुवारी ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर (स्केल १,२ आणि ३) परीक्षेचा निकाल जाहीर केला. आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ते आपला निकाल या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. या वृत्ताच्या अखेरीस हा निकाल पाहण्याची थेट लिंकही देण्यात येत आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख ही माहिती देऊन लॉगइन करता येणार आहे. हा निकाल आयबीपीएसच्या संकेतस्थळावर ३० जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध राहणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यासंदर्भात आयबीपीएसने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये असं लिहिलंय की, 'राखीव प्रवर्गांची यादी तात्पुरती असून ती त्या त्या RRB ने दिलेल्या प्रत्येक प्रवर्गातील रिक्त जागा आणि उमेदवारांची उपलब्धता यानुसार तयार केली गेली आहे. या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर नियुक्तीबाबत वैयक्तिक माहिती कळवण्यात येईल.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KUAFsH
via IFTTT

Post a Comment

0 Comments