MPSC पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

Prelims 2020: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध पूर्व परीक्षांच्या तारखा सोमवारी ११ जानेवारी रोजी आयोगाने जारी केल्या आहेत. या परीक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये होणार होत्या पण विविध कारणांमुळे त्या पुढी ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या परीक्षांचा समावेश आहे. या सर्व प्रलंबित परीक्षा आता मार्च आणि एप्रिल २०२१ मध्ये होणार आहेत. कोविड-१९ संदर्भात शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने उपाययोजना करून या परीक्षांचे आयोजन करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सह सचिवांनी परिपत्रकात म्हटले आहे. परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे - परीक्षेचे नाव -- पूर्वीची तारीख -- सुधारित तारीख राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० -- ११ ऑक्टोबर २०२० -- १४ मार्च २०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० -- २२ नोव्हेंबर २०२० -- ११ एप्रिल २०२१ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० -- १ नोव्हेंबर २०२० -- २७ मार्च २०२१हेही वाचा :


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q9czcG
via IFTTT

Post a Comment

0 Comments