PNB बँकेत भरती; पदवीधरांना संधी

recruitment 2021पंजाब नॅशनल बँकेत (PNB Bank) सुरक्षा व्यवस्थापक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. सिक्युरिटी मॅनेजर पदांसाठी इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करू शकतात. अर्ज करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. बँकेद्वारे भरतीची अधिसूचना २७ जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थापकांची एकूण १०० पदे भरली जाणार आहेत. यासाठी पीएनबी बँकेची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर लॉगइन करून अर्ज डाऊनलोड करावा लागेल. कसा भराल PNB Bank सुरक्षा व्यवस्थापकअर्ज? pnbindia.in या पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करावे. होमपेजवरील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जा. आता संबंधित रिक्रुटमेंटसाठी उपलब्ध अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा. यानंतर शुल्क भरून डिपॉझिट वाउचरची एक कॉपी आणि अन्य कागदपत्रांसोबत एका लिफाफ्यात भरावे. लिफाफ्यावर सुरक्षा व्यवस्थापक पदासाठी अर्ज असे लिहून हा लिफाफा अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवावा. अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. अन्य अर्हतेविषयी अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन वाचावे. वयोमर्यादा किमान वय २१ वर्षे तर कमाल वय ३५ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयात नियमानुसार सवलत देण्यात येईल. वयाची गणना १ जानेवारी २०२१ नुसार केली जाईल. हेही वाचा: निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीचाच एक भाग निबंध / पत्र लेखन परीक्षेचा असेल, या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांचे लेखन कौशल्याचे आकलन केले जाईल. यातून शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होतील. हेही वाचा: महत्त्वाच्या तारखा अर्ज आणि कॅश वाउचर डाऊनलोड करण्यास सुरुवात - २७ जानेवारी २०२१ अर्ज आणि कॅश वाउचर डाऊनलोड करण्याची अंतिम मुदत - १३ फेब्रुवारी २०२१ कार्यालयात अर्ज मिळण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२१ हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j8EWpm
via IFTTT

Post a Comment

0 Comments