Also visit www.atgnews.com
RRB NTPC फेज २ परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
Admit Card: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पोस्ट (NTPC) फेज २ ऑनलाइन परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. ऑनलाइन परीक्षा १६ जानेवारी २०२१ ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत देशभरात आयोजित करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते त्यांचे अॅडमिट कार्ड अधिकृत प्रादेशिक संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. बोर्डाद्वारे ३५ हजार पदांसाठी सिलेक्शन राउंड १ अंतर्गत संगणकीकृत परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १६ जानेवारी २०२१ पासून आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २७ लाख उमेदवार एनटीपीसी परीक्षेत सामील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३ लाख उमेदवार सामील झाले होते. अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड येत्या शनिवार १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एनटीपीसी फेज २ सीबीटी १ परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोक करण्यासाठी उमेदवारांना संबंधित रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाइटवर भेट द्यावी. अॅप्लिकेशन नंबर आदी माहिती भरून सबमीट करावे. मग नव्या पेजवर आपली माहिती भरून सबमीट करावी. यानंतर तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवावे आणि एक प्रिंटही काढून ठेवावे. परीक्षा केंद्रावर जाताना ऑनलाइन अॅडमिट कार्डच्या प्रिंटसह एक फोटो आयडी प्रूफही सोबत न्यावा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i6GkrS
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments