SSC JE 2018 Result: स्टाफ सिलेक्शनच्या जेई परीक्षेत १,८४० उमेदवार यशस्वी

JE 2018 Final Result: कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्युनिअर इंजिनीअर (JE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. जे उमेदवार या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात प्रमाणपत्र पडताळणीच्या टप्प्यात होते, त्यांचा हा निकाल आहे. प्रमाणपत्र पडताणळीचा टप्पा ११ सप्टेंबर रोजी पार पडला. ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग अँड काँन्ट्रॅक्ट्स) पदांसाठी ही पेपर २ परीक्षेसाठी ही प्रमाणपत्र पडताळणी ११ सप्टेंबर रोजी पार पडली होती. निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या अशा सर्व उमेदवारांचे तपशीलवार गुण आयोगाच्या संकेतस्थळावर १३ जानेवारी २०२१ रोजी अपलोड केले जाणार आहे. हे गुण एका महिन्याच्या कालावधीसाठी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. उमेदवार त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक, पासवर्ड आदी माहितीसह त्यांचे गुण पाहू शकतील. आयोगाने निश्चित केलेल्या कट ऑफ गुणांच्या आधारे पेपर २ मध्ये सिव्हील इंजिनीअरींगचे ३,८०० उमेदवार तर इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरींगचे ८८३ उमेदवार प्रमाणपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले होते. यापैकी नियुक्तीसाठी १,८४० उमेदवारांची निवड झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3shdNo6
via IFTTT

Post a Comment

0 Comments