RRB NTPC परीक्षा: सीबीटी १ संदर्भातील माहितीची लिंक अॅक्टिव्ह

RRB NTPC Exam 2021 Date: रेल्वे भरती बोर्डाद्वारे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती (NTPC) २०१९ प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्प्यात आयोजित केली जाणारी संगणकीकृत परीक्षा (सीबीटी १) च्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे २७ लाख उमेदवार परीक्षा देणार आहेत. आरआरबीने परीक्षेची तारीख, सत्र आणि परीक्षा केंद्राचं शहर आदी माहिती देण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड देून लॉग इन करायचे आहे. अॅडमिट कार्ड आणि परीक्षा केंद्राचं शहर पाहण्यासाठी ही लिंक पुढे देण्यात येत आहे. अॅडमिट कार्ड कधी? परीक्षेत ई-कॉल लेटर / अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आरआरबी एनटीपीसी फेज-२ परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याआधी चार दिवस म्हणजेच १२ जानेवारी २०२१ पर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर दिले जातील. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवता येईल. या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी हेल्प डेस्क ही बनवले आहेत. आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावर हे ऑनलाइन हेल्पडेस्क उपलब्ध आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LqzEse
via IFTTT

Post a Comment

0 Comments