अकरावी ऑनलाइनच्या ३२ टक्के जागा यंदा रिक्त

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा प्रादुर्भाव तसेच लांबलेली प्रवेश प्रक्रिया यामुळे यंदा अकरावीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. याचबरोबर सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. यानंतरही काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसून प्रवेशासाठी विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर प्रवेशाच्या अखेरच्या फेरीनंतर एक लाख दोन हजार १८१ म्हणजे एकूण जागांच्या ३१.८९ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन प्रक्रियेतील ८० हजार ९९० तर इन हाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील मिळून २१ हजार १९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदा तीन नियमित व दोन विशेष फेऱ्या यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या सात फेऱ्या या टप्प्यांनी प्रवेश प्रक्रिया पार पडली. या सर्व प्रक्रियेत सुमारे दोन लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी दोन लाख १८ हजार २०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर सुमारे ४० हजार ६४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाहीत. मागील वर्षी दहावीचा निकाल कमी लागूनही दोन लाख १८ हजार ७२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. यंदा निकाल चांगला लागल्याने सुमारे दोल लाख ३० हजार विद्यार्थी प्रवेश निश्चित करतील अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NLCKs2
via IFTTT

Post a Comment

0 Comments