ICAI CA November Result: सीए नोव्हेंबर परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI CA November results 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सोमवारी सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल सीए अंतिम परीक्षेचा निकाल - icaiexam.icai.org, caresults.icai.org, i ca i.nic.in ICAI CA November results: कसा पाहाल निकाल? स्टेप १- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा. स्टेप २- ' link' लिंक वर क्लिक करा. स्टेप ३ - आता विचारलेली माहिती भरा. स्टेप ४ - निकाल आता तुमच्या स्क्रीवर दिसू लागेल. स्टेप ५ - भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या. नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४,७१,६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १,०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला खूप विरोध होत होता. प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना महामारीसंबंधी मुद्द्यांमुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत यासाठी आणखी एक संधी देण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oJw3DW
via IFTTT

Post a Comment

0 Comments