Also visit www.atgnews.com
नीट पीजी २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेस सुरुवात
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2021) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ची नोंदणी लिंक दुपारी 3 वाजता कार्यान्वित झाली आहे आणि 2021 साठी ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२१ आहे. एमडी / एमएस / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर nbe.edu.in यावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षा कधी घेतली जाईल? २०२१ परीक्षा १८ एप्रिल रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल. ३१ मे पर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पीजी २०२१ साठी पात्रता उमेदवारांकडे नीट पीजी २०२१ साठी पात्र होणअयासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेचे MBBS पदवी (तात्पुरती किंवा कायमस्वरूपी) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे एमसीआय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र देखील असले पाहिजे. नीट पीजी २०२१ उमेदवारांनी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली असली पाहिजे. नीट पीजी प्रवेश परीक्षेद्वारे १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) आणि १,९७९ पीडी डिप्लोमा जागांवर ६,१०२ शासकीय, खासगी, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aL68aV
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments