Also visit www.atgnews.com
जेईई मेन २०२१ परीक्षा: विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स
जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम मेन २०२१ (JEE Main 2021) चा पहिला टप्पा २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि परीक्षा २३, २४, २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. आपणही या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे जाणून घ्या. या परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. परीक्षेच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा - १) सूचना योग्य रीतीने वाचा: कोणतीही महत्वाची माहिती सुटू नये म्हणून माहिती काळजीपूर्वक वाचा. २) विभागाची निवड: प्रथम रसायनशास्त्र विभाग निवडण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे प्रश्न सोडवा, कारण जर आपण हा विभाग त्वरीत पूर्ण केला तर उर्वरित विभागात आपण पुरेसा वेळ देऊ शकता. ३) प्रत्येक विभागाला वेळ द्या, वेळेचे व्यवस्थापन करा: प्रत्येक विभागासाठी वेळ वाटून घ्या. असे केल्याने तुम्ही प्रत्येक विभागाला पुरेसा वेळ देऊ शकाल. आपण कोणत्याही विभागासाठी जास्त वेळ घालवत नाही आहोत, याची खात्री करा. रसायनशास्त्राला ४० मिनिटे, गणिताला ६० मिनिटे आणि भौतिकशास्त्रावर ८० मिनिटे देण्याचा सल्ला दिला जातो. ३) प्रत्येक प्रश्नासाठी लागणारा वेळः एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. जर कोणताही प्रश्न आला तर ताबडतोब करा, परंतु कोणत्याही प्रश्नावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका. ५) सर्व प्रश्न वाचा: प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. जर उमेदवारांनी प्रश्न चांगले वाचले तर उमेदवार चुका करणे टाळू शकतात. ६) पर्याय काळजीपूर्वक वाचा: सर्व चार पर्याय काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. वाचताना घाई करू नका. ७) परीक्षेच्या वेळी शांत राहा: आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी शांत राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच परीक्षेच्या वेळीही शांत राहण्यावर भर द्या. परीक्षेच्या वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक- दोन वेळा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे मेंदूला आराम मिळतो. ८) स्वत:वर विश्वास ठेवा: जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता. प्रेरणा ही त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा घटक असतो. या किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. ९) त्वरित नवीन प्रश्न सोडवायला घेऊ नका: शेवटी नवीन असलेल्या संकल्पना टाळा. आधी आपल्याला जे येते ते आधी सोडवावे. १०) अंदाज लावू नका, खात्री कराः अंदाजानुसार उत्तरे निवडणे योग्य नाही. उमेदवारांनी ज्या प्रश्नांची त्यांना खात्री नाही अशा प्रश्नांची उत्तरे सोडावीत. ज्यांबाबत खात्री आहे, अशीच उत्तरं द्यावीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bsaMtx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments