कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल व एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर

CS Professional results 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (ICSI) घेण्यात आलेल्या प्रोफेशनल व एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. ज्यांनी ही परीक्षा दिली आहे ते icsi.edu या वेबसाइटवरून निकाल पाहू आणि डाऊनलोड करू शकतात. प्रोफेशनल प्रोग्राम (नवीन आणि जुना अभ्यासक्रम) दोन्ही परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. एक्झिक्युटिव कोर्समध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पेपरमध्ये (पेपर १,२,३, आणि ४) कमीत कमी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. सर्व पेपरमध्ये सरासरी एकूण ५० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर वैयक्तिक निकालाशिवाय विषयनिहाय ब्रेक अप देखील उपलब्ध होणार आहे. ICSI CS Professiona results 2020: कसा पाहाल? स्टेप १ - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा. स्टेप २ - 'What's new' सेक्शन मध्ये जा. स्टेप ३ - विचारलेली माहिती भरा. स्टेप ४ - आता निकाल स्क्रीन वर दिसू लागेल. स्टेप ५ - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा. हेही वाचा :


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZRwB0p
via IFTTT

Post a Comment

0 Comments