IBPS PO Main परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी

PO Main Scorecard 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने बुधवारी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) - X Mains चा निकाल आणि अधिकृत वेबसाइट वर स्कोअरकार्ड जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी IBPS PO मेन्स परीक्षा दिली होती ते आपला निकाल वर १३ मार्च, २०२१ पर्यंत ऑनलाइन पाहू शकतात. आईबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी मुख्य परीक्षेचे आयोजन ४ फेब्रुवारी २०२१ रोजी केले होते. या परीक्षेचा निकाल अलीकडेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केला होता. जे उमेदवार पूर्व परीक्षेत यशस्वी झाले होते, त्यांनी मुख्य परीक्षा दिली होती. यापूर्वी आयबीपीएसने पीओ/एमटी पूर्व परीक्षा ३ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर, ११ ऑक्टोबर आणि ५, ६ जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली होती. याचे निकाल १४ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केले होते. या भरतीच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनीच्या एकूण ३,५२७ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. IBPS PO main scorecard 2021: कसा पाहाल निकाल? स्टेप १ - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. स्टेप २ - IBPS PO मेन्स स्कोअर लिंकवर क्लिक करा. स्टेप ३ - विचारलेली माहिती भरा आणि सबमीट करा. स्टेप ४ - स्कोअर आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५ - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ss0n8k
via IFTTT

Post a Comment

0 Comments