सरकारी नोकरीची संधी; नॅशनल बुक ट्रस्टमध्ये भरती

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील () मध्ये विविध रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध २४ पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये सिस्टेंट डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन), असिस्टंट एडिटर, प्रोडक्शन असिस्टंट, एडिटोरियल असिस्टंट, एकाउंटंट, सीनियर स्टेनोग्राफर, असिस्टंट, लायब्रेरियन, ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी), लायब्ररी असिस्टंट, ज्युनियर आर्टिस्ट आणि ड्रायव्हर आदि पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार ट्रस्टची अधिकृत वेबसाइट nbtindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या अॅप्लिकेशन फॉर्मच्चया माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाइन मोडद्वारे जमा करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. असा करा अर्ज? अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनबीटीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे वा या वृत्तात दिलेल्या थेट लिंकद्वारे अधिसूचना वाचू शकतात. अर्जाचा नमूनाही अधिसूचनेत दिला आहे. हा अर्ज डाऊनलोड करून संपूर्ण भरून, सोबत मागितलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोडून दिलेल्या मुदतीत पुढील पत्त्यावर जमा करायचा आहे - डेप्युटी डायरेक्टर, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, नेहरु भवन, ५, इन्स्टिट्यूशन एरिया, फेज - २, वसंत कुंज, नवी दिल्ली -११००७०१. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया या नावाने नवी दिल्लीत ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्टही पाठवायचा आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oNX8Wc
via IFTTT

Post a Comment

0 Comments