Also visit www.atgnews.com
अकरावी ऑनलाइनच्या प्राधान्य फेरीला चांगला प्रतिसाद
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर अनेक जागा रिक्त राहिल्या तर काही विद्यार्थी प्रवेशाविनाही राहिले होते. या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने शिक्षण विभागाने आणखी एका प्राधान्य फेरीचे आयोजन केले. या फेरीला चांगला प्रतिसाद मिळत असून पाच दिवसांत तब्बल तीन हजार ७३५ अर्ज आले आहेत. त्यापैकी तीन हजार ६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. १३ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे. दहावी नियमित किंवा पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना राहिले असल्याच्या तक्रारी येत होत्या. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी अतिरिक्त एफसीएफएस फेरीचे आयोजन शुक्रवारपासून केले आहे. मुंबई विभागात ऑनलाइनच्या माध्यमातून या प्रवेशफेरीसाठी ८२ हजार ९० जागा उपलब्ध होत्या. या जागांवर गेल्या पाच दिवसांत तीन हजार ७३५ अर्ज आले होते. त्यापैकी तीन हजार ६९ जणांनी प्रवेश घेतले आहेत. एफसीएफएस प्रक्रियेद्वारे त्यांना अलॉटमेंट मिळालेल्या जागांवर प्रोसिड फॉर अॅडमिशन या बटणावर क्लिक करून प्रवेश निश्चित करता येणार आहेत. १३ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश अकरावी प्रक्रियेमध्ये निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईत आत्तापर्यंत प्रवेशाच्या सर्व मिळून तब्बल १२ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दोन लाख १८ हजार २०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. आता आणखी तीन हजार विद्यार्थ्यांची अकरावीला वाढ झाली आहे. शेवटच्या एफसीएफस फेरीतील आकडेवारी उपलब्ध जागा : ८२,०९० आलेले अर्ज : ३,७३५ घेतलेले प्रवेश : ३,०६९ हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aSIYOX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments