Also visit www.atgnews.com
'या' राज्याचा मोठा निर्णय; नववी ते अकरावीचे विद्यार्थी होणार विनापरीक्षा पास
तामिळनाडू सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. पलानीस्वामी यांनी बुधवारी ही घोषणा केली. बारावीची परीक्षा कधी होणार? राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही राज्य मंडळाने जारी केले आहे. परीक्षा ३ मे ते २१ मे दरम्यान आयोजित केली जाईल. तामिळनाडूतील शाळा १९ जानेवारीपासून उघडण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले होते. तामिळनाडू सरकारने त्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा पुरवण्याची देखील परवानगी दिली आहे, ज्यांना दहावी, बारावी बोर्ड परीक्षांना उपस्थित राहायचे आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा ३ मे पासून भाषा विषयाच्या पेपरपासून सुरू होणार आहेत आणि २१ मे ला केमिस्ट्री, अकाउंटन्सी आणि जॉग्रफी पेपरने समाप्त होणार आहेत. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल. परीक्षा सकाळी १० ते दुपारी १.१५ पर्यंत आयोजित केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aXmei5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments