इंजिनीअरिंगचे प्रवेश घटले; राज्यात ४५ टक्के जागा रिक्त

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया पूर्ण झाल्यानंतर इंजिअनीअरिंग अभ्यासक्रमाच्या सुमारे ४५ टक्के जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. तर यंदा व्यवस्थापन विषयाच्या सुमारे ३३ टक्के जागा रिक्त राहिल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील इंजिनीअरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रवेश प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. इंजिनीअरिंगच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण यंदाही कायम आहे. मात्र, यंदा राज्यात बंद केलेली काही कॉलेजे त्यामुळे कमी झालेल्या जागा लक्षात घेता रिक्त जागांच्या प्रमाणात अल्पशी घट झाली आहे. यंदा सरकारी शिक्षण संस्थातील बहुतांश जागा भरल्या आहेत. मात्र, विनाअनुदानित संस्थात निम्याहून अधिक जागा रिकाम्या राहिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यभरातील ३३१ संस्थात यंदा एक लाख २३ हजार ८९५ जागा होत्या. त्यापैकी ६८ हजार ४५१ जागांवर प्रवेश झाले आहेत. तर तब्बल ५५ हजार ४४४ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. जागा रिक्‍त राहण्याचे प्रमाण ४४.७५ टक्के इतके आहे, तर गतवर्षी हे प्रमाण ४८ टक्के होते. गेल्या काही वर्षापासून इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी कमी होत आहे. यंदा तर कोरोनाकाळात प्रवेश प्रक्रिया काही काळ लांगली. असे असले तरी सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून आले. विनाअनुदानित संस्थातील प्रवेशाची स्थिती भयावह आहे. राज्यभरात ३१० संस्था विनाअनुदानित आहेत. या संस्थात तब्बल एक लाख १७ हजार २३४ जागा आहेत. त्यापैकी केवळ मागणी असलेल्या अभ्यासक्रम धरुन ६२ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर या संस्थांत ५४ हजार ६६७ जागा रिक्‍त राहिल्या आहेत, तर शासकीय ९ संस्थात असलेल्या तीन हजार २७० जागापैकी २ हजार ९७९ जागांवर प्रवेश झाले आहेत. तर २९१ जागा रिकामी झाल्या आहेत. इंजिनीअरिंग पदव्युत्तरलाही जागा रिक्त इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना 'एमई'च्या १९६ असलेल्या संस्थात १२ हजार ४५६ इतक्या जागा होत्या. त्यापैकी पाच हजार ५७९ जागावर प्रवेश झाले आहेत. तर ६ हजार ८७७ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. रिक्‍त जागा राहण्याची टक्केवारी ५५.२१ टक्के इतकी आहे. 'व्यवस्थापन'च्या जागाही रिक्त यंदा व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सुमारे १० हजार ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. व्यवस्थापनासाठी ३१५ संस्थांमध्ये ३२ हजार २७९ जागा आहेत. या जागांवर २१ हजार ६७३ प्रवेश झाले तर १० हजार ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. व्यवस्थापन शाखेला एवढ्या जागा रिक्त राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q4YjSD
via IFTTT

Post a Comment

0 Comments