Also visit www.atgnews.com
सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही; करोना काळातील १०० टक्के फी भरावी लागणार
सर्वोच्च न्यायालयाने शालेय शिक्षण शुल्कासंदर्भातील एका सुनावणीत सोमवारी असे निर्देश दिले की करोना महामारी काळातील सर्व १०० टक्के शालेय फी पालकांना भरावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश म्हणजे पालकांना मोठा धक्का समजला जात आहे. राजस्थानमधील एका शाळा व्यवस्थापन समितीने ही याचिका दाखल केली होती. करोना काळातील म्हणजेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील सर्व शालेय शुल्क पालकांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षात भरलेल्या शुल्काइतके भरावे लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. सोसायटी ऑफ कॅथलिक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आणि सवाई मानसिंग विद्यालय, गांधी सेवा सदनची विद्या भवन सोसायटीची व्यवस्थापन समिती यांनी दाखल केलेल्या याचिकांवर संयुक्त सुनावणी घेत सुप्रीम कोर्टाने हे अंतिरम आदेश दिले. पालकांना ५ मार्च २०२१ पासून ६ टप्प्यांत ही फी भरायची आहे. हा आदेश देताना दुसरीकडे कोर्टाने असेही स्पष्ट केले की शालेय शुल्क भरले नाही या कारणामुळे एकाही विद्यार्थ्याचे नाव शाळेतून काढू नये. तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसण्यापासून मज्जाव केला जाऊ नये. यापूर्वी राजस्थान सरकारने २८ ऑक्टोबरच्या आदेशानुसार, राजस्थान शालेय शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना ६० टक्के तर सीबीएसई बोर्डाच्या शाळांना ७० टक्के फी आकारण्यास सांगितले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tIBLcA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments